Life of Stories

# 1539: मधमाशा नसलेलं जग. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

August 05, 2024 डॅा. सौ. आरती जुवेकर.

मधमाशी. आपल्या नखाएवढा किडा. पण त्याचं निसर्गाच्या जीवचक्रामध्ये खूप महत्त्वये. तुम्हाला माहितीये का एखाद्या फुलावर मधमाश्या का बसलेल्या असतात? कधी विचार केलाय का? मला तर लहानपणी वाटायचं की त्या फुलांमधून गोडवा शोषून घेतात आणि आपल्या पोळ्यात टाकतात मग आपल्याला गोड मध खायला मिळतो. पण खरं तर मधमाश्या परागीभवनाच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. परागीभवन म्हणजे वनस्पतीमधील प्रजननाचा महत्त्वाचा भाग. परागीभवन झाले तरंच वनस्पती आपले बीज तयार करत असते.