Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Episodes
1907 episodes
# 1914: काळजी करू नकोस बेटा, सॅम आमचा आहे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
तितक्यात मी एक विलक्षण दृश्य बघितले. एक सहा फुट उंच, रुबाबदार अशी व्यक्ती तिथे आली, पटकन जमिनीवर खाली एक गुडघा टेकवून बसली, सॅमचा हात आपल्या दोन्ही हातांनी प्रेमाने धरून त्यांनी तो हात स्वतःच्या डोक्याला आणि ओठाना लावला, अतिशय मृदू आवाजात नम्रप...
•
8:37
# 1913: सुगरण पक्षिणी नव्हे तर पक्षी बांधतो घरटे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
‘अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला’ ही बहिणाबाई चौधरी यांची कविता आपण सर्वांनी ऐकलेली आहे. परंतु, वास्तवात मादी नव्हे तर नर सुगरण पक्षी काडी-काडी जमा करून खोपा विणतो आणि मादीला आकर्षित करतो. त्याच झाडाच्...
•
4:50
# 1904: वंदेमातरम् ची १५० वर्षे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
या वर्षी आपण वंदेमातरम या गीताची १५०वर्ष पूर्ती साजरी करत आहोत. सात नोव्हेंबर या दिवशी १८७५ साली बँकिंचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम ही सहा दिव्य श्लोक किंवा कडवी असलेली स्वर्गीय रचना केली. जगाच्या पाठीवर एव्हढी उदात्त रचना झाली नाहीये आणि होणा...
•
6:21
# 1903: प्रार्थना. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
बालपणापासून आपल्याला ‘जीवनातील प्रार्थनेचं महत्व‘ सांगितले जाते. जेव्हा काही समजतही नव्हते, तेव्हासुद्धा देवासमोर उभं करून हात जोडायला शिकवले जायचे. थोडे समजायला लागल्यावर “बाप्पाला सांग मला चांगली बुद्धी दे”, असं बोलायला शिकवले. आणखी थोडे समजद...
•
9:20
# 1902: आता हे बाळ म्हणजे माझा भाचा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
कर्नाटकातील बेलवडी येथील (आताचे यादवाड) श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प हे एक प्राचीन शिल्प आहे, जे १६७८ साली म्हणजे त्यांच्या हयातीतच बनवले गेले होते. हे शिल्प तेथील श्री. मारुती मंदिरात सापडले आहे आणि ते बेलवडीच्या मराठा मोहिमे दरम्यानचे...
•
6:21
# 1901: आईच्या चप्पलांची किंमत. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
गोविंद म्हणाला, " मला माझ्या आईसाठी चप्पल हवी आहे. ती नेहमी अनवाणीच असते, त्यामुळे तिच्या चपलेचं माप नाहीये माझ्याकडे. हो, पण माझ्याकडे माझ्या आईच्या पायाचे माप नसलं तरी तिच्या पायाची आकृती आहे, त्यावरून चप्पल देऊ शकाल का?"दुकानदाराला हे अज...
•
3:20
# 1900: अती विचारांवर ७ जपानी उपाय. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
आजकाल अनावश्यक विचार किंवा अतिविचार (ओवरथिंकिंग) करणे, ही एक सामान्य समस्या बनली आहे. लहानसहान गोष्टींवर सतत विचार करणे, भविष्याची काळजी करणे किंवा एकाच विचारात अडकून पडणे, या गोष्टी आपल्या मनाची शांती हिरावून घेतात. जपानी जीवनशैलीमध्ये अशा अने...
•
5:18
# 1899: "The will of Amrita Pritam" कथन/ (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Fully conscious and in good health, I am writing today my will.After my death, Ransack my roomSearch each item, That is scatteredUnlocked Everywhere in my house.Donate my dreams, To all those wo...
•
5:57
# 1898: "हरणाऱ्या घोड्यावर, कोणी पैसे लावत नसतं" लेखक: विशाल गरड. कथन: (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
"आपली शेती फायद्याची बिलकुल नाही याचा दिंडोरा पिटणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोरांना कोण आपली मुलगी देईल? हरणाऱ्या घोड्यावर कोणी पैसे लावत नसतोय!मुलांनी शेतीतील नवनवी तंत्रे शिकून घेऊन दरवर्षी ५० लाखांची पॅकेज काढतोय असे सांगितलं तर का त्याचे ल...
•
3:33
# 1897: "अमृत आणि विष यांच्यातील रेषा." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
लहानपणापासून पॅरासेल्ससचं निरीक्षण अफाट.त्याला दगडांमध्ये, धातूंमध्ये, औषधी वनस्पतींमध्ये ‘ऊर्जेचं तत्त्व’ दिसायचं. तो म्हणायचा,”जगातील प्रत्येक गोष्ट विषारी आहे;फक्त त्याचं प्रमाण ठरवतं की ती औषध ठरेल की विष.”त्यानं पार्य...
•
7:17
# 1896: DNA वाले जेम्स वॅाटसन. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
विसाव्या शतकाच्या मध्यात डीएनएची रचना कशी शोधली गेली याची ही कहाणी आहे, ही महत्त्वाकांक्षा, सहकार्य आणि स्पर्धेची कहाणी आहे. या शोधाच्या जनकांपैकी एक असलेले जेम्स वॅाटसन यांचे काही दिवसांपूर्वी म्हणजे, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ९७ व्या वर्ष...
•
9:33
# 1895: "ज्याचा स्व जिवंत आहे त्याचा मृत्यू अटळ आहे." भ.ओशो. कथन (प्रा.सौ. अनुराधा भडसावळे. )
दुसऱ्या दिवशी मृत्युदूत पुन्हा त्या दालनात गेला. सर्वत्र नजर फिरवत तो म्हणाला, "अहाहा, काय सुंदर कारागिरी! एक चूक सोडली तर...""अगदी हुबेहूब एकमेकांसारख्या दिसणाऱ्या १२ मूर्ती आहेत ह्या!""चूक ? कोणती चूक ?",...
•
1:16
# 1894: "सुनिता बाई आणि पु.ल." लेखक सुभाष अवचट. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
सुनीताबाईंनी त्या संध्याकाळी बोरकरांच्या कविता एकामागून एक, जादू उलगडत जावी तशा ऊलगडल्या. ते अनपेक्षित लाघव मला पेलवेना. मी खुर्चीत थिजून गेलो. त्या संध्याकाळी अख्खं बालगंधर्व, बोरकर नावाच्या लाटेवर उसळून ओसंडून जात राहि...
•
17:56
# 1893: हसणे, हसणे आणि अधिक हसणे...! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
जेव्हा नॉर्मनने त्याच्या बरे होण्याच्या शक्यतांबद्दल विचारले तेव्हा डॉक्टरांनी त्याला असं काहीतरी सांगितलं की ते ऐकून तो गार पडला:ते म्हणाले,"पाचशे रुग्णांपैकी फक्त एकच यातून वाचतो."त्या रात्री, नॉर्मनने जीवन बदलणारा निर्णय घेतल...
•
5:09
# 1892: मोल नेहमीच पैशात नसतं...! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
फळवाल्या म्हातारीला कृष्ण म्हणतो, "ती सगळीच फळं मला दे. "म्हातारी आनंदली. म्हणाली, " हो हो देईन बाळा, पण मोल द्यावं लागेल."कृष्ण निरागसपणे विचारतो, "मोल म्हणजे काय ?" त्यावर ती समजावून सांगते, "लल्ला, आपण जेव्हा कोणाकडून काही घ...
•
8:57
# 1891: "Nature doesn’t punish, it balances." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
काय अद्भुत होतं ते दृश्य!विजयी अल्फा नरने दुसऱ्याच्या मानेवर फक्त हलके दात टेकवले. चावा नाही, रक्तपात नाही . त्या क्षणी सत्तेचा प्रश्न सुटला होता.पर...
•
6:59
# 1890: Ten days in a mad-house. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
‘पिट्सबर्ग डिसपॅच’ या स्थानिक वृत्तपत्रात‘मुली कसल्या कामाच्या?’ अशा आशयाचा एक लेख छापून आला. अपत्यप्राप्ती करून देणे आणि घर राखणे, मुली एवढ्याच कामाच्या असे त्या लेखक महाशयांचे म्हणणे. वयाच्या जेमतेम विशीत पाऊल ठेवलेल्या एलिझाबेथने त्यावर एक ख...
•
11:36
# 1889: उत्सवाचं रसायन. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
अगदी आदिमानवाच्या काळापासून उत्सव ही माणसाच्या मनाची गरज आहे. आदिमानव शोधीपारधी होता. अन्नाच्या, शिकारीच्या शोधात वणवणताना त्याला सगळीकडून शत्रूंचं, संकटांचं भय असे. त्या वेगवेगळ्या संकटांवर लक्ष ठेवायची जबाबदारी त्याच्या मेंदूतल्या एका केंद्रा...
•
6:58
# 1888: बेला आणि कल्याणी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
जेव्हा मोहम्मद घोरी आपल्या देशाला लुटून गजनीकडे परत गेला, तेव्हा "गजनीचे सर्वोच्च काझी व मोहम्मद घोरीचे गुरु निजामुल्क" यांनी त्याचे स्वागत आपल्या महालात केले आणि म्हणाले –"या घोरी या! आम्हाला तुझा अभिमान आहे की तू हिंदुस्थानवर विजय मिळवून ...
•
6:54
# 1887: "चालवीसी हाती धरूनिया" लेखिका : सावनी गोडबोले. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
आपल्या हाताला धरून चालायला शिकलेली आपली मुलं जेव्हा मोठी होतात... शिक्षण-नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडतात तेव्हा त्यांच्या आचार-विचार-अनुभवांची कक्षा रुंदावत जाते. त्यांच्या आयुष्याच्या वाटेवर येणाऱ्या प्रत्येक बऱ्या-वाईट गोष्टीचा सामना करण्...
•
11:56
# 1886: आता मला काही फरक पडत नाही. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
रमेशजींचं वय आता ६५ वर्षांचं झालं होतं. वयानुसार त्यांचा स्वभावही हळूहळू बदलत चालला होता. आधी ते खूप हसतमुख आणि सर्वांशी मिसळणारे होते, पण आता त्यांच्या स्वभावात चिडचिडेपणा येऊ लागला होता. कोणत्याही छोट्या गोष्टीवर राग येणं, मुलांवर ओरडणं, किरक...
•
6:48
# 1885: भुलभुलैय्या... भुलेचा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
'नायट्रस ऑक्साईड' हा वायू 'लाफिंग गॅस' म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचा शोध लागला तेंव्हा तो वायू हुंगण्याच्या पार्ट्या होत असत. मोठेमोठे अमीर-उमराव जेवणानंतर नायट्रस हुंगत आणि मोठ्यामोठ्याने हसत सुटत, एकमेकांच्या माकडचेष्टा करत, याने त्यांची चांगली...
•
11:12
# 1884: "अपंगत्व नाकारता येत नाही ...!" लेखिका : उर्मिला आगरकर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
मानसी जन्मतः कर्णबधिर. तिचं बधिरत्व १०५ टक्के: म्हणजे जलद लोकल जाताना होणाऱ्या आवाजाने फलाट दणाणतो तशा प्रकारच्या आवाजाला मानसीने प्रतिसाद दिला नाही. .. एके दिवशी मानसी दरवाजात उभी असताना जवळचे नातेवाईक घरी आले आणि मानसीला...
•
11:48