Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Episodes
2119 episodes
# 2122 : " कृष्णजन्म " (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
कृष्णाच्या जन्माच्या रात्री मथुरेत मुसळधार पाऊस कोसळत होता. तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडले आणि वसुदेव कृष्णाला टोपलीत घेऊन यमुनेकडे निघाले. दुथडी भरून वाहणारी यमुना कृष्णाच्या चरणांशी येऊन शांत झाली आणि शेषनागाने फण्यांचं ...
# 2119 : सहवासाची भूक. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
"आई... तुम्ही जेवलात ना?" वैशालीने सहजच विचारलं.समोर बसलेल्या सुमित्रा काकूंनी हलकंसं हसत उत्तर दिलं, "हो गं सूनबाई... पोटभर जेवले."पण वैशाली स्वयंपाकघरात गेली, तर सिंकमध्ये ठेवलेल्या स्टीलच्या ताटाकडे तिचं लक्ष गेलं. ताटात अर्धी कोरडी ...
# 2118 : सासुबाईंची अट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
"सूनबाई... या घराच्या चाव्या तुला तेव्हाच देईन, जेव्हा तू माझी एक अट मान्य करशील."नववधू स्वराने आश्चर्याने आपल्या सासूबाई सुमनताई यांच्याकडे पाहिले.तिच्या मनात विचार आला, "कदाचित सासूबाई घराचे नियम सांगतील... पहाटे लवकर उठायचं, डोक्यावर...
# 2117 : एका गाण्याची गोष्ट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
जयश्रीबाईंनी सुरेश भटांना विचारले..., त्यांची माफी मागितली.., सुरेशभाऊ नुसतेच हसले..., गाडी सुटणार तेव्हढ्यात सुरेश भाऊंनी एक कागद जयश्री ताईंच्या हातात ठेवला..!"हे घ्या आपले गाणे..! आपली व्यावहारिक अडचण मला समजते जयश्रीताई.., पण त्याचे...
# 2116 : तुमचा आशीर्वाद हिच भेट! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
हळूहळू खात्री पटायला लागते की लोकांनी पत्रिकेतील सूचना गंभीरपणे घेतली आहे. आपणही पाकीट खिशातून काढत नाही. उलट मनात यजमानांचं कौतुक सुरू होतं. किती छान विचार आहे. शेवटी लग्न म्हणजे माणसांनी एकत्र येणं. पैशाचा व्यवहार कशाला? माझ्यातला समाजसुधारक ...
# 2115 : आपण चुकीच्या वाटेवर चालू नये म्हणून.. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
सारंग आधीच प्रचंड मानसिक तणावात होता. त्याचा पुण्यातला कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय बुडण्याच्या मार्गावर होता. आज सोलापूरमध्ये दुपारी दोन वाजता त्याची एका सरकारी अधिकाऱ्यासोबत अत्यंत महत्त्वाची मिटिंग होती. एक मोठा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी तो तब्बल पन्...
# 2114 : पण त्यांचे अनुभव अमूल्य असतात. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
आधी जेवणाच्या टेबलावर महेंद्रजी एखादा मजेशीर किस्सा सांगत असत. आता, सर्वजण शांतपणे जेवण आटपून आपापल्या खोलीत निघून जात.सर्वात मोठा बदल आरुषमध्ये झाला होता.त्याने आजोबांच्या खोलीत जाणे जवळपास बंद केले होते. त्याला वाटायचे की आजोबा आता त्...
# 2113 : निवृत्ती म्हणजे शेवट नाही. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
रिटायर झाल्यानंतर त्यांना वाटलं, आता आपली कोणालाच गरज नाही.. पण सुनेने असा एक निर्णय घेतला की त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलली. निवृत्ती म्हणजे शेवट नाही… स्वतःला पुन्हा शोधण्याची वेळ असते ही...
# 2112 : अडीच मिनीटात संपवला अपहरणाचा थरार. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
कॅप्टन उरी बार-लेव्ह ॲमस्टरडॅमहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एल -अलच्या प्रवासी विमानाचे उड्डाणाची तयारी करत होते. या फ्लाईट्ची (El Al Flight 219 ) सुरुवात तेल अवीवहून झाली होती आणि ॲमस्टरडॅम हा त्यातील दुसरा टप्पा होता.उड्डाणापूर्वी शिफोल विमानत...
# 2111 : त्सुतोमु यामागुची. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
त्या दिवशी जेव्हा ते तिथून निघण्याच्या तयारीत होते, तेव्हा हिरोशिमावरील आकाशाचे स्वरूप अचानक बदलले. यामागुची यांनी वर पाहिले असता, त्यांना अमेरिकेचे B-29 हे बॉम्बर विमान आकाशातून उडताना दिसले. त्यातून पॅराशूटला जोडलेली एक छोटी वस्तू खाली ...
# 2109 : जिथे सर्वच ‘होयबा‘ असतात. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
रशियाचा हुकूमशहा आपल्या खोलीत बेशुद्ध पडला होता… पण बाहेर उभ्या असलेल्या कुणाचीही आत जाण्याची हिंमत होत नव्हती. ज्याच्या एका शब्दाने माणसं तुरुंगात जायची, त्याच्यासाठी डॉक्टरांना बोलवायचं की नाही, हे ठरवायलाही सगळे घाबरत होते. ...
# 2110 : "438 दिवस समुद्रात...!" ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
जगातला सर्वात मोठा महासागर म्हणजे प्रशांत महासागर. याच महासागरात, मेक्सिकोच्या किनाऱ्यावर मासेमारी करणारा होता जोसे साल्वाडोर अल्वारेंगा. त्याच्याकडे होती फक्त सात मीटर लांबीची एक छोटीशी नाव.एका दिवशी मासेमारीला गेले...
# 2108 : "जीवन का जगावं?" पु.ल. देशपांडे. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
प्रिय चंदू.जीवनाचा मळा आपण शिंपावा. उगवलं तर उगवलं. मग कुठल्याही क्षेत्रात तू ऐस. वैमानिक ऐस अगर हमाल ऐस. बोजा टाकायचाच आहे तर तो आनंदाने टाकावा. वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विझवाव्या. My dear boy, whose deat...
# 2107 : प्रेमाला प्रतिसाद हवा असतो . (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
"परतफेडीची संधीच न ठेवता केलेली मदत हे उपकार होतात. ते कोणालाही आवडत नाहीत". "तुम्ही त्यांना फूल ना फुलाची पाकळी म्हणून परतफेडीची संधी दिलीत. बरोबरीला आणलंत." "प्रेम फक्त बरोबरीच्या नात्यातच जन्मू शकतं! माणसाला असं वाटाय...
# 2106 : "अत् दीप भव." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
ही कथा फक्त कंदिलाची नाही.आपण अनेकदा दुसऱ्यांच्या ज्ञानावर, दुसऱ्यांच्या अनुभवावर, दुसऱ्यांच्या विचारांवर किंवा दुसऱ्यांच्या मतांवर जगत असतो. पण तो उजेड कायमचा नसतो. एखाद्या क्षणी तो विझतो... आणि मग आपल्यालाच अंधारात चाचपडावं लागतं.<...
# 2105 : हिटलरचा मृत्यू. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात हिटलर जमिनीच्या ५० फुट खाली बनलेल्या बंकरमध्ये राहात होता. फक्त आपली लाडकी कुत्री ब्लाँडीला फिरवायला कधीकधी चॅन्सलरी बागेत जायचा तेव्हा चारी बाजूला बाँम्बमुळे उद्ध्वस्त झालेल्या इमारतींचे अवशेष पडले...
# 2104 : कथा नागपंचमीची. : श्रद्धेत दडलंय विज्ञान (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं.श्रावणमास आला. नागपंचमीचा दिवस उजाडला. वारुळात जी नागाची नागकुळं होती, त्यांना नांगराचा फाळ लागला........जशी नागीण शेतकरी कुटुंबावर प्रसन्न झाली, तशी तुम्ह...
# 2103 : घन घन माला नभी दाटल्या" लेखक : सुमित्र माडगूळकर. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
"ज्ञानियाचा वा तुक्याचा, तोच माझा वंश आहे,माझिया रक्तात थोडा, ईश्वराचा अंश आहे…”असं आपल्या कवितेतून सांगणारे कवी, गीतकार आणि साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या लेखणीतून अनेक अजरामर गाणी जन्माला आली. त्यापैकीच एक गीत&...
# 2102 : "Monkeys PAW" . रूपांतर : आोशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
ताईत असो की जादूची कांडी, इच्छा मागताना जरा जपूनच! कारण आपल्याला काय हवंय हे कळतं; पण ते मिळाल्यावर काय होईल, याचा अंदाज नेहमीच येतो असं नाही. प्रत्येक इच्छा पूर्ण होणं आपल्यासाठी चांगलीच ठरेल असं नाही. कधी कधी हवी अ...
# 2101 : "देवाला हवं होतं फक्त एक पेला पाणी!" ओशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
एक तरुण देवाच्या भक्तीत इतका रमला की त्याने जगातल्या सगळ्या सुखांकडे पाठ फिरवली. देवाने त्याला एकच काम दिलं—“मला एक पेला पाणी आण.” पण पाणी आणायला गेलेला तो एका सुंदर मुलीच्या घरी अडकला…म्हातारपणी देवासमोर पोहोचल्यावर त्याने विचारलं, “मला...
# 2100 : "न्यूट्रल थिंकिंग" लेखिका डॉ. स्वाती गानू. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
आपल्या माणसांच्या चुका, सवयी लगेच डोळ्यात भरतात… पण त्यांच्यातलं चांगलं किती वेळा दिसतं? एकदा जरा न्यूट्रल होऊन बघा, माणूसच वेगळा दिसायला लागतो! इतरांकडे पाहण्याची ही नजर हळूहळू स्वतःकडेही वळते. मग क...
# 2099 : ऑस्ट्रेलियन रानटी उंट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
ऑस्ट्रेलियाच्या विस्तीर्ण आणि निर्जन अशा 'आउटबॅक' प्रदेशात लाखो उंट मुक्तपणे फिरत असतात. पण मध्य-पूर्वेकडील प्रदेशाची ओळख असलेल्या या प्राण्यांचे इथे इतक्या मोठ्या संख्येने असणे कसे शक्य झाले?खरं सांगायचं तर, मला तिथे उंट दिसण्याची अजिब...
# 2098 : खिडकी जवळची जागा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
मी माझ्या खिडकीजवळच्या जागेवर बसलो होतो, तेवढ्यात साधारण सात वर्षांचा एक छोटा मुलगा त्याच्या वडिलांचा हात धरून माझ्या शेजारी आला.तो हळूच म्हणाला,“काका… जर तुमची हरकत नसेल, तर मला खिडकीजवळ बसता येईल का?”मी उत्तर देण्याआधीच त्याचे वडी...
# 2097 : उलटे लटकण्याची शिक्षा.. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
स्वर्गातून पृथ्वीकडे पाहताना एकादशी देवीच्या मनात एक वेगळाच संघर्ष सुरू होता. संपूर्ण जगात तिचे भक्त अन्नाचा एक कणही न खाता, स्वतःला कष्ट देऊन तिचे कडक व्रत पाळत होते. पण तिची नजर जेव्हा पुरीच्या श्रीक्षेत्र धामावर पडली, तेव्हा तिथे तिला वेगळेच...
# 2096 : एक नव्हे दोन महाशंख" ओशो (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
एक भक्त होता. भगवान शंकरांनी त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला इच्छापूर्ती करणारा शंख दिला. पण त्याच वेळी त्याच्या नजरेस पडला त्याहून मोठा महाशंख, आणि त्याचा लोभ जागा झाला. हा महाशंख प्रत्येक गोष्ट दुप्पट देण्याचं वचन द्यायचा... पण त्याचं ए...