Life of Stories

# 1540: सीता सेतू. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

August 06, 2024 डॅा. सौ. आरती जुवेकर.

केरळ राज्यातील वायनाड नावाच्या डोंगराळ भागातील काही गावे त्यांच्या पाठीशी असलेल्या डोंगरांनी आपल्या पोटात घेतली आणि नकाशातून ही सारी गावेच नाहीशी झाली...शेकडो लोक मातीच्या खाली गाडले गेले कायमचे. पावसाचे प्रचंड थैमान सुरु होते. सुरालमाला गावाजवळच्या मुन्दाकाई खेड्याच्या आसपासची चार गावे नाहीशी झालेली होती. आणि या गावांशी संपर्क करणयासाठी असलेला नदीवरील जुना पूल नष्ट झाला होता. बचावलेल्या नागरीकांना मदत या पोहोचवण्यासाठी पुलाची उभारणी करायला पाहिजे होती. लष्कराला माहिती मिळाली त्याच दिवशी बंगळूरू येथुन पुलासाठी अत्यावश्यक सारे साहित्य सुमारे २० गाड्यांमध्ये भरून रवाना केले. या कामाचे नेतृत्व दिले गेले होते या तुकडीतील एकमेव महिला अधिकारी मेजर सीता अशोकराव शेळके या शूर महिलेकडे.