Life of Stories

# 1541: जैसे कर्म तैसे फळ. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

August 07, 2024 डॅा. सौ. आरती जुवेकर.

राजाने दिव्यदृष्टी द्वारा पाहिले की साधारण पन्नास जन्मांपूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्यांनी एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच वृक्षावरील बरेचसे पक्षी पळून गेले, मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक आंधळे झाले तर पक्षांची शंभर एक लहान पिल्ले उडून न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली. राजाचे हे त्या जन्मीचे क्रियामान कर्म, फळ देण्याची योग्य संधी पहात संचित रूपात शिल्लक राहिले आणि या जन्मात राजाला त्याच्या काही अन्य पुण्याच्या फलस्वरूप जेव्हा शंभर पुत्र झाले तेव्हा ते संचित कर्म पक्व होऊन राजाला फळ देण्यास सज्ज झाले परिणामतः राजा आंधळा जन्माला आणि त्याचे शंभरच्या शंभर पुत्र युद्धात मरण पावल्याचे दुःख राजाला अनुभवावे लागले.