Life of Stories

# 1544: स्वामी गोवू इंदा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

August 11, 2024 डॅा. सौ. आरती जुवेकर.

ऋषी अगस्त्य आश्रमात परतले आणि जेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांकडून त्यांच्या अनुपस्थितीत श्रीनिवासच्या आगमनाबद्दल ऐकले तेव्हा त्यांना अत्यंत नैराश्य आले. "श्रीमन नारायण स्वतः लक्ष्मीसह माझ्या आश्रमात आले होते तेव्हा दुर्दैवाने मी आश्रमात नव्हतो ,खुप मोठा योग माझ्याकडून हुकला, तरीही काही हरकत नाही पण श्रींना हवी असलेली गाय मला दिलीच पाहिजे " व ऋषि ताबडतोब गोशाळेत दाखल झाले आणि एक पवित्र गाय घेऊन भगवान श्रीनिवास आणि देवी पद्मावती यांच्या दिशेने धावत निघाले.
थोड्या अंतरावर धावल्यानंतर त्यांना श्रीनिवासन व त्यांच्या पत्नी पद्मावती दृष्टीक्षेपात आले. त्यांच्या मागे धावत ऋषीनी तेलुगू भाषेत हाक मारायला सुरुवात केली.
"स्वामी(देवा) गोवु(गाय)इंदा (घेऊन जा)(तेलुगूमधील गोवु म्हणजे गाय आणि इंदा म्हणजे घेऊन जा.