Life of Stories

# 1545: खेळ विषामृताचा: भाग १. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

August 12, 2024 डॅा. सौ. आरती जुवेकर.

सर्पदंशाचे दोन प्रकार आहेत, कोरडा दंश आणि विषबाधा. ज्यावेळी सापाने दंश केल्यावर त्याच्या विषग्रंथीमध्ये निर्माण झालेले विष त्याच्या दातांच्या पोकळीतून माणसाच्या (किंवा अन्य प्राण्याच्या) रक्तात मिसळते, त्यावेळी त्याला विषबाधा होते. अन्यथा तो कोरडा दंश मानला जातो. सर्वसाधारणपणे ७० टक्के सर्पदंश हे कोरडे असतात. सर्पदंश अधिकतर ग्रामीण, वनक्षेत्रात होतात. सर्पदंशावर तत्काळ उपाययोजना न झाल्यास मृत्यू येतो. भारतात सर्वात जास्त सर्पदंश महाराष्ट्रात (प्रतिवर्षी ३५ ते ४० हजार) होतात. सर्पदंशाने सर्वात जास्त म्हणजे सुमारे ७,००० मृत्यू उत्तर प्रदेशात होतात.