Life of Stories

# 1546: खेळ विषामृताचा: भाग 2 ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

August 13, 2024 डॅा. सौ. आरती जुवेकर.

ह्या लसीच्या पूर्ण परिणामकारकतेसाठी प्रत्येक विषबाधित रुग्णाला सरासरी २५ मात्रा द्याव्या लागतात. सर्पदंशानंतर रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी, लसीची किमान पहिली मात्रा रुग्णाला सर्पदंश झाल्यापासून एक तासाच्या आत द्यावी लागते. सर्पदंशानंतर एक तासात रुग्णाला लस देणे, हे एक मोठे आव्हान आहे. बहुतेक रुग्ण हे निम्न आर्थिक स्तरातील, अशिक्षीत, ग्रामीण दुर्गम भागातील असल्याने त्यांना सर्पदंशावर वेळेवर योग्य उपाययोजना करणे कठीण जाते.