Life of Stories

# 1556: ‘आठवणी गदिमांच्या‘. लेखक आनंद माडगूळकर. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

August 28, 2024 प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.

'प्रपंच' ही पटकथा पूर्णत्वाच्या मार्गावर होती. विठ्ठलावरील भक्तीने ओथंबलेले गीत गदिमांकडून लिहून झालेले नव्हते. त्यामुळे बाबूजींचा पारा चढला होता. ते काहीतरी गदिमांच्या आळशीपणा बद्दल  त्यांना बोलले. 
 रागाने तणतणत गदिमा पंचवटीच्या फाटकाजवळ गेले. रस्त्याच्या पलीकडे बुरूडांच्या दोन चार झोपड्या होत्या. तिथे तीन चार लहान मुले  आऱ्यावर  ठेवलेले  चाक गरगर फिरवीत होती. तेवढ्यात  वस्तीतील एक वृध्द त्या मुलांना , "ए वेड्यांनो पळा इथून" असे काहीसे म्हणाला. 
गदिमा ग॔मत बघत तिथेच उभे होते. ते गरगरणारे चाक बघून ते आपल्या खोलीत दार लावून बसले. केवळ दहा मिनीटांत त्यांनी   लिखाणाचा कागद बाबूजींना दिला. तेच हे अजरामर भक्तिगीत!
फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार.....!