Life of Stories

# 1558: उद्या आमचे बापू वारीला चाललेत. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

August 31, 2024 प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.

“बापू, मग माय ला मोक्ष नाही मिळणार?”... मी विचारलं...
माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवून माय हसत म्हणाली... “पोरा.. ते मोक्ष बिक्ष असल्या गोष्टींचा विचार आयांनी करायचा नसतो बग... आई जर या नादाला लागली.. तर घरादाराकड कोण बघल?... समदी घडी इस्कटून जाईल की!!... आमचं पंढरपूर बी हितच आणि विठोबा बी हितच!!... 
जगाची रीत असत्या रे...इथं विठ्ठलाच्या झोपन्याचाबी सोहळा हुतोय!... आणि तिकडं ती रुक्मिणी बसतीये... बाकीचा पसारा सांभाळत!!"