Life of Stories

#1562: निरुपद्रवी जीवंत प्राणी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

September 04, 2024 डॅा. सौ. आरती जुवेकर.

पार्सल पोस्ट सुरू झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर, जेसी आणि मॅथिल्डा बीगल नावाच्या एका ओहायो मधिल जोडप्याने त्यांचा 8 महिन्यांचा मुलगा जेम्स याला त्याच्या आजीला “मेल” केले, जी बटाव्हियामध्ये जवळच राहत होती. युनायटेड स्टेट्स पोस्टल सर्व्हिस च्या इतिहासकार जेनी लिंच यांच्या म्हणण्यानुसार, बेबी जेम्स पार्सल पोस्टद्वारे पाठवलेल्या पॅकेजसाठी 11-पाऊंड वजनाच्या मर्यादेत होता आणि त्याच्या "डिलिव्हरी" साठी त्याच्या पालकांना पोस्टेजमध्ये फक्त 15 सेंट खर्च झाला आणि वर $50 चा विमा काढण्यासाठी काही ठराविक रक्कम त्यांनी दिली. त्यानंतर त्याला मेलमनच्या स्वाधीन केले, ज्याने त्या मुलाला त्याच्या आजीच्या घरी, नेऊन पोहोचवलं.