Life of Stories

# 1561: संकटात साथ सोडू नका. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

September 02, 2024 डॅा. सौ. आरती जुवेकर.

इंद्र म्हणाला, "हे बघ भाऊ.., या झाडाला ना पानं, ना फुलं, ना फळं. आणि आता हे झाड पुन्हा हिरवं होईल, असं कोणी तरी म्हणू शकेल का? कारण ते आता मरणासन्न झालेलं आहे. झाडाने स्वत: सुध्दा जगण्याची आशा सोडून दिली आहे. आणि जंगलात काय हे एकच झाड आहे का? अरे, या जंगलात अशी अनेक झाडे आहेत, ज्यांच्या मोठमोठ्या ढोल्या रहायला अगदी योग्य आहेत आणि त्या पानांनी झाकलेल्या आहेत. ती झाडेही फळे आणि फुलांनी भरलेली आहेत. तेथूनही तलाव पण जवळ आहे. मग तरीही, तू या झाडावर काय करतोस, तिथे दुसऱ्या झाडावर का जात नाहीस?"