Life of Stories

# 1543: केदारनाथ ज्योतिर्लिंगाची कथा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

डॅा. सौ. आरती जुवेकर.

Send us a text

या प्रमाणे, पांडव आणि द्रौपदी एक दिवस महादेवाच्या शोधात हिमालयापर्यंत आले. इकडे, जेव्हा महादेवांनी या लोकांना पाहिलं तेव्हा ते बैलाच्या रुपात लपून राहिले, परंतु युधिष्ठीराने भगवान शिवाला असं लपताना पाहिले. तेव्हा युधिष्ठीराने त्यांना सांगितले की तुम्ही कितीही लपून राहिलात तरी, हे प्रभु, आम्ही तुम्हाला भेटल्या शिवाय येथून जाणार नाही आणि मला हे देखील माहित आहे की आम्ही पाप केलेले आहे म्हणून आम्हाला टा़ळण्यासाठी आपण आमच्यापासून लपून बसला आहात. युधिष्ठिरांनी असे म्हटल्यानंतर पांडव त्या बैलाला पकडायला पुढे जायला लागले. त्याचवेळी त्यांच्यावर त्या बैलाने जोरदार हल्ला केला. हे पाहून भीमाने त्याच्याशी युद्ध करण्यास सुरुवात केली. त्याने त्याच्यावर गदेचा जोरदार प्रहार केला. तर बैलाने आपले डोके जमिनीत लपविले, त्यानंतर भीमाने त्याची शेपूट खेचण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बैलाचे धड डोक्यापासून वेगळे झाले आणि त्याच्या  शेपटाकडील उरलेला भाग शिवलिंगात बदलला.