Life of Stories

# 1556: देवळा बाहेरचा विठ्ठल. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.

विठ्ठलाच्या मंदिरापाशी सात वर्षाची एक चिमुरडी आपल्या दीड वर्षाच्या भावाला घेऊन लता दिदींचे 'ज्योती कलश छलके...' गात होती..
      कपडे बेताचेच.. घरची गरिबी प्रचंड असावी.. पण सुरांची सरस्वती मात्र तिच्यावर प्रसन्न होती.. तिच्या तेजस्वी रुपात आणि प्रतिभासंपन्न गळ्यात लक्ष्मी साक्षात उतरली होती..पण तिच्या शेजारची ती पाटी मात्र माझ्या डोक्यातून काही निघत नव्हती. त्यावर लिहिले होते,  'मला शिकायचंय..'!