Life of Stories

# 1559: "मुलीला हरणी नको; तर वाघीण बनवा." लेखक हनुमंत वि. भोंडेकर. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.

“लोकहो, आपल्या मुलीबाळींच्या रक्षणासाठी आता पूर्वीसारखे ‘सह्याद्रीत शिवराय’ नाहीत. आज शहरातील मुली जीव मुठीत धरून जगत आहेत. आम्ही तर दऱ्याडोंगरात राहतो. डोंगरवासीयांच्या मुली संकटात सापडता, कोणी मदतीला येण्याची शक्यता नसते; किंवा अत्याचार झाल्याची बातमी सुद्धा जगासमोर येत नाही.”

 “मंडळी तुमची मुलगी शेळी किंवा हरणी सारखी दिसली  तर तिला त्रास दिला जाऊ शकतो; पण तुमची मुलगी वाघासारखी दिसली, वागली; तर शहरी किंवा गावातले मानवी कोल्हे लांडगे शंभर टक्के दूर पळतात.”