Life of Stories

# 1563: क्रांतीसिंह नाना पाटील. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

September 04, 2024 डॅा. सौ. आरती जुवेकर.

त्या घरामधून  येणारे  गाणे जसेजसे  कानावर पडायला लागले तसे हे  सर्व  क्रांतीकारक  रडायला लागले मग त्यांनी दारावर  थाप मारली  त्या भगिनीने दार  उघडले  दारात असणार्या माणसाना पाहून तिने विचारले  "काहो? कोण तुम्ही आमच्या मालकाकडं आलाय ? उठवू का त्यास्नी ? " 
"ताई  मला तुलाच भेटायचं हाय. तू आता ज्याला आयुष्य मागत हुतीस  त्योच तुझा भाऊ मी नाना पाटील. ताई  तुझ्यासारखी बहिण पाठीशी असल्यावर कोण माझ्या केसालाही धक्का लावणार न्हाय. काळजी करू नगस."
 साक्षात नाना पाटीलांना समोर पाहिल्यावर ती हरकून गेली.