Life of Stories

# 1571: "माझी गौरीमाय." लेखिका निता चंद्रकांत कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

September 13, 2024 प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.

गौरी माय म्हणाली, "पण खूप काम करून दमून नको जाऊस.....सण साजरा करताना त्यातला आनंद घ्यायला शिक. 
आता लेकी बाळी नोकरी करणाऱ्या आहेत. 
त्याचं घराची खरी लक्ष्मी आहेत हे विसरू नकोस...
त्या आनंदात असतील तर घर सुखात असतं...
हे केलंच पाहिजे.. ते केलंच पाहिजे... असं म्हणत बसू नकोस .
काही बदल करताना मनात भीती नको ग  ठेवूस... माझ्यावर प्रेम करतेस ना मग  मला भ्यायचं कशाला ?"