Life of Stories

# 1572: 'गौरीमाय' ला निरोप लेखिका नीता चंद्रकांत कुलकर्णी कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

September 13, 2024 प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.

"गौरी माय तू यायच्या आधीच आम्हाला शहाणं केलं होतंस..
 त्यामुळे आम्ही  अन्न वाया  नाही घालवलं..
 घरचे पण आनंदित झाले.
हळूहळू   जमेल तसा थोडा थोडा बदल करत आहेत.
रूढी ,परंपरा ,रीती ,रिवाज यांचे दडपण  आहे.
 काय होतं आई खरं सांगू का ... बदल केला आणि काहीतरी विपरीत घडलं की वाटतं 
आपण बदल केला म्हणूनच  हे असं झाल. लगेच मनात संशय येतो देवी  किंवा देव आपल्यावर  कोपला तर नसेल?"...