Life of Stories

# 1575: हत्तींशी बोलणारा माणूस. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

September 16, 2024 Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

प्रसंगानुरूप हत्तींचं वर्तन कसं असतं, हे मीच काढलेल्या छायाचित्रांचे पुन्हा पुन्हा निरीक्षण करताना माझ्या लक्षात येऊ लागलं. त्यांची एकमेकांशी संवादाची भाषा, त्यांच्या भाव-भावना, हत्तीच्या पिलांची भाषा, हे मी प्रत्यक्ष हत्तींच्या निरीक्षणातून शिकलो. माणसामध्ये जसे वेगवेगळे स्वभावधर्म आहेत, तसे हत्तींमध्येही राग, लोभ, मोह, माया, मत्सर, आनंद आणि भीती असे भाव असतात, हे लक्षात आले. मग मला त्यांच्याशी संवाद साधणं सोपं झालं.