Life of Stories

# 1605: आपले विचारच आपल्याला घडवतात...! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

डॅा. सौ. आरती जुवेकर.

Send us a text

अमेरिकेत एका कैद्याला मृत्युदंडाची शिक्षा द्यायची असते. त्याच्यासमोर एका पिसाळलेल्या कुत्र्याला विषारी इंजेक्शन देण्यात आले. तो कुत्रा तडफडून मरण पावला.
 मृत्युदंडाच्या शिक्षेची वाट पाहणाऱ्या या कैद्यासमोरच हे सर्व घडत असल्याने त्याच्या मनात त्या इंजेक्शनचे विचार सुरू झाले. 
त्यानंतर त्या कैद्याला तिथेच ग्लुकोजचे साधे इंजेक्शन दिले गेले. मात्र, दोन तासातच तो मृत्युमुखी पडला व पोस्टमार्टेममध्ये त्याच्या शरीरात विषनिर्मिती झालेली दिसली. 
याचे कारण त्या कैद्याने आपल्यालाही विषारी इंजेक्शन दिल्याची कल्पना केली आणि त्यातून ग्लुकोजच्या इंजेक्शन नंतरही त्याच्या शरीरात विषारी स्रावांची निर्मिती झाली. त्यामुळे त्याच्या हृदयावर ताण येऊन त्याचा मृत्यू ओढवला.