Life of Stories

# 1606: हॅप्पी रिटायर्ड लाईफ...! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

डॅा. सौ. आरती जुवेकर.

Send us a text

"अगं म्हणजे कामवाल्या बाईचा interview  हे घेतात. विचार त्यांना".... अदिती 
"अनिल तू घेतोस interview ?".... मी 
 "अरे it  is  a technique, how  to negotiate with  her "... अनिल सांगत होता.. “म्हणजे असं बघ. मी तिला विचारतो 'तू किती पैसे घेणार दर महिन्याचे'. मग ती म्हणते '७०० रुपये'. त्यात केर - लादी, सिंक मधील छोटी भांडी घासणे आणि आठवड्यातून एकदा फर्निचर पुसणे. 
 मग मी तिला म्हणतो 'बरं. आता मी काय सांगतो ते ऐक. 'कपड्यांच्या घड्या करून ठेवणे, खिडक्यांच्या कडा पुसणे, रोजची भाजी चिरून किंवा निवडून ठेवणे ही कामे पण करावी लागतील. या प्रत्येक कामाचे २५ रुपये याप्रमाणे एकूण ७५ रुपये मी जास्त देणार. मान्य?' ती एकदम सहज मान्य करते"..... अनिल.  इथे आमचा जोरात हशा!
"कमाल आहे राव तुझी" ....मी हसत हसतच म्हटले.
"खरी गम्मत पुढची. ऐक. मी तिला विचारतो 'महिन्यात दांड्या किती मारणार? प्रामाणिकपणे सांग.' यावर ती थोडसं अडखळत म्हणते 'दोन होतातच साहेब. काय करनार कितीबी केलं तरी व्हतातच'.
 मी म्हणतो, ठीक आहे. ती पण माणूस आहे. अडचणी येणारच. मग तिला मी सांगतो 'हे बघ दोन दांड्या ठीक आहेत. तिसरी दांडी झाली नाही तर त्या महिन्यात २५ रुपये अजून जास्त!" आम्ही सर्व अवाक आणि हास्याचा मोठा फवारा!
 "मानलं तुला. सुपर आयडिया आहे यार!" ....मी 
 "अरे तुला माहिताय... ती दुसरीकडे दांडी मारते. पण माझ्याकडे तिसरी दांडी मारत नाही".... आम्ही हसून हसून फक्त पडायचे राहिलो होतो!