Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Life of Stories
1619: ‘आपली राष्ट्रीय दांभिकता.' कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
देशाच्या प्रगतीचे मापन करायचे झाले तर नागरिक काय लायकीचे काय लायकीचे आहेत या निकषावर करायला हवे.
पाहता आपल्या नागरिकांचे सार्वजनिक उद्योग?
रात्री दोन वाजता ढिनच्यॅक ढिनच्यॅक संगीत गाडीत वाजवत गल्ल्यांतून फिरणारे,
गाडीचा दरवाजा उघडून ओकल्यासारखे तंबाखू थुंकणारे,
ऐतिहासिक इमारतींवर स्वत:चे आणि स्वत:च्या टिनपाट मैत्रिणीचे नाव कोरणारे,
कोणी बघत नाही म्हणून सार्वजनिक शौचालयाचा वापर करून पाणी न टाकता निघून जाणारे, शाळेतल्या लहान मुलांना वाटायला आणलेल्या खिचडीचा तांदूळ बाजारात नेऊन विकणारे.....
ही यादी कितीही लांब होऊ शकते......