Life of Stories

1619: ‘आपली राष्ट्रीय दांभिकता.' कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

देशाच्या प्रगतीचे मापन करायचे झाले तर नागरिक काय लायकीचे  काय लायकीचे आहेत या निकषावर करायला हवे.
पाहता आपल्या नागरिकांचे सार्वजनिक उद्योग?
रात्री दोन वाजता ढिनच्यॅक ढिनच्यॅक संगीत गाडीत वाजवत गल्ल्यांतून फिरणारे, 
गाडीचा दरवाजा उघडून ओकल्यासारखे तंबाखू थुंकणारे, 
ऐतिहासिक इमारतींवर स्वत:चे आणि स्वत:च्या टिनपाट मैत्रिणीचे नाव कोरणारे, 
कोणी बघत नाही म्हणून सार्वजनिक शौचालयाचा वापर करून पाणी न टाकता निघून जाणारे, शाळेतल्या लहान मुलांना वाटायला आणलेल्या खिचडीचा तांदूळ बाजारात नेऊन विकणारे.....
ही यादी कितीही लांब होऊ शकते......