Life of Stories

# 1621: जनुकांचे नियंत्रण करणारी बटणं. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

प्रश्न असा येतो की मेंदू काय, हृदय काय, यकृत काय... सगळ्यांकडे जनुकांचा तोच वारसा असतो. मग ते नियमित नाही तरी अडअडचणींत तरी एकमेकांची काम का करू शकत नाहीत? आणि तसंच पाहिलं तर नियमितपणेही ते आपलं वेगळेपण कसं काय टिकवून ठेवतात? हे कोडं वैज्ञानिकांना कित्येक वर्षं सतावत आहे. त्याचं एक उत्तर शोधून काढणाऱ्या व्हिक्टर अँम्ब्रोज आणि गॅरी रुव्हकून या दुकलीला यंदाच्या वैद्यकीय नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.