Life of Stories

# 1622: म्हणून पृथ्वीच्या फिरण्याचा वेग झाला कमी? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Season 1622 Episode 1622

Send us a text

जेव्हा थ्री गॉर्जेस धरण बांधले गेले तेव्हा यांग्त्झी नदीचे  42 बिलियन टन पाणी त्या धरणाच्या मागे समुद्रसपाटीपासून 175 मीटरपर्यंत अडवले गेले. यामुळे पृथ्वीचा जडत्वाचा क्षण थोडासा बदलला, ज्यामुळे पृथ्वीचं रोटेशन अधिक हळू होतंय. पृथ्वीचे परिभ्रमण कमी झाल्यामुळे, एका दिवसाची वेळ 0.06 मायक्रोसेकंदने वाढली आहे. म्हणजेच दिवस आता काही क्षणांनी मोठा झाला आहे. थ्री गॅार्ज डॅमच्या बांधकामामुळे उत्तर आणि दक्षिण ध्रुव देखील आपापल्या ठिकाणाहून प्रत्येकी 2 सेंटीमीटर सरकले आहेत असेही म्हटले जाते. याशिवाय पृथ्वी उत्तर ध्रुवावर थोडीशी सपाट झाली आहे.