Life of Stories

# 1631: श्रीक्षेत्र जेजुरी आणि कडेपठार. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

जेजुरगडाच्या मागे उंच डोंगरावर असलेलं कडेपठार  हे खंडोबाचं मूळ स्थान आहे, याची माहिती फारशी नसते. जेजुरीचं दर्शन घेऊन आल्याचं सांगणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावर ‘कडेपठारचं मूळ स्थान पाहिलं का’, असं विचारल्यावर मात्र ‘हे काय नवीन,’ अशी भावना दिसते. त्यामुळं जेजुरीला जाणाऱ्या भक्तांनी खंडोबाचं हे मूळ ठिकाण पाहायलाचं हवं. जेजुरीपेक्षा इथं पोहोचणे थोडं खडतर असलं, वाट थोडी अवघड असली, तरी देवाच्या आद्यस्थानाचं दर्शन त्यांना सुखावणारं असेल, यात शंका नाही.