Life of Stories

# 1633: रद्दीवाला. लेखक कौस्तुभ केळकर नगरवाला. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

 रघू तसा बुद्धीनं यथातथाच. पण धंद्यात डोकं भारी चालायचं. कुठली रद्दी आहे, कुठल्या रद्दीला सेकंडमधे सोन्याचा भाव आहे, हे त्याला बरोबर कळायचं. कसाबसा बारावीपर्यंत शिकला. आन् धंद्याला लागला.

वर्षभरात गणूकाका गेले,  अन् रघूचा रघूशेट झाला. तसाच हसमुखराय चेहरा. गोडबोल्या स्वभाव. ईलेट्राॅनिक काट्यावर अचूक वजन करायचा. चोख भाव. हिशोबाला पक्का. दुकानाबाहेर वाचणेबल पुस्तकं , मासिकांचं प्रदर्शन. रद्दीवालं गिर्हाईक बाहेर घुटमळायचंच. जाताना एखादं पुस्तक घेऊन जायचंच जायचं.
 रद्दी टाकायला मी अजूनही लकडी पुलावर जातो. माझ्या आवडत्या खुर्चीवर बसून पुस्तकं चाळतो. फोटोतल्या गणूकाकांना भेटतो. मजा येते.