Life of Stories

# 1701: "बालपण". लेखिका: आसावरी सुधीर हंजे. कथन: (आसावरी हंजे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

बालपणातल्या आठवणी या कोणत्याही माणसाच्या आठवणीच्या कुपीत बंद असतात. उघडल्या की अत्तराच्या सुंगाधाप्रमाणे  मनभर दरवळतात.
ती कुपी बंद करू नये अस वाटत राहतं. आपण जिथे खेळलो,वाड्याच्या अंगाखांद्यावर बागडलो, स्वयंपाक घरात अन्न ग्रहण केले,उबदार पांघरुण घेऊन खोलीत झोपलो,माजघरात गप्पा गोष्टी केल्या,ती ठिकाणे मनाच्या तळाशी कोपऱ्यात जाऊन बसलेली असतात.