Life of Stories

# 1713: चौकट आक्रसत चाललीय. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

असाच एकदा मी कपडे इस्त्रीला टाकण्यासाठी तिथे गेलो होतो. आजींच्या बाजूला त्यांचा नातू उभा होता. आज तो खूपच छान नटून आलेला. कपाळावर टिळा, छान नवे कपडे. तीन चार वर्षाचा त्यांचा नातू, छान गोरा, गुटगुटीत अन् गोड. तो त्याच्या आजीला सांगत होता, "आजी तू उद्यापासून त्या सुमंत आजीबरोबर बोलायचं नाही बघ." 
आजीने विचारलं," का रे, काय केलं त्या आजीनं तुला?
तो: "काही नाही असंच." 
आजीनं पुन्हा पुन्हा विचारलं, पण तो काही कारण सांगत नव्हता. त्याचं आपलं एकच पालुपद, "तू त्या आजीबरोबर नाही बोलायचं."
शेवटी आजी म्हणाल्या, "थांब मी त्यांना फोन करून बोलवून घेते अन विचारतेच, काय केलं आमच्या नातवाला म्हणून." 
मग नातू सांगू लागला, "मी त्यांच्या समोरुन दोनदा गेलो तरी आजी मला 'हॅपी बर्थडे' म्हणाली नाही. तू नाही बोलायचं."
अच्छा! म्हणजे आजीनं 'हॅपी बर्थ डे' म्हटलं नाही याचा त्याला राग आला होता तर.