Life of Stories

# 1714: स्नेक ॲंड लॅडर आणि ज्ञानेश्वर. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

नेहमीच्या साप-शिडी पेक्षा ज्ञानदेवांच्या साप-शिडीचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ही साप-शिडी चित्रांकित आहेच परंतु शब्दांकितही आहे. म्हणजे साप शिडीच्या पटाला संलग्न असणाऱ्या दुसर्‍या पटावर कोणती कवडी कोणत्या घरात पडली तर नेमकं कसं वागावं यासंबंधीचं भावपूर्ण मार्गदर्शन अगदी सहज सुंदर ओव्या मधून केलेलं आढळतं.
उदा. तुम्ही क्रोधाच्या घरात गेलात तर तिथे तुम्हाला संयमाचं महत्व सांगणारी ओवी भेटेल. तुम्ही विद्येच्या घरात गेला तर विद्या विनयाने कशी शोभते या संबंधीचा गुरुमंत्र भेटतो.