Life of Stories

# 1715: शब्दकळा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

अगदी शेलक्या शब्दात उल्लेख करायला मराठी भाषेत उदंड शब्दसमूह आहेत . आमच्या नात्यातल्या एका मुलीचं लग्न जमायला जरा अवघड जात होतं कारण काय ? तर म्हणे “ म्हशीनं पाय दिलाय ना नाकावर !” गोरीपान मुलगी असेल आणि तिचा नक्षा जर कुठलं  वाक्य उतरवत असेल तर “ पांढरी पाल तर आहे , रंग काय चाटायचाय ! “ अत्यंत आळशी पुरुषाचा उल्लेख सहजपणे “ दिवसभर शेणाच्या पो सारखा पडलेला असतो “ असा होई . खरं तर वरची वाक्य मन दुखावणारी नाहीत का ? पण आमच्या आसपासचा स्त्रीवर्ग सहजपणे हे बोलून जाई . ऐकणा-याला पण फार खेद खंत वाटत नसे.