Life of Stories

# 1718: "माझी आजी, जुनी गाणी आणि Alexa " लेखिका : ऋजुता दीक्षित. कथन : ( मृदुला जोशी )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

एवढं सगळं लक्षात ठेवणारी आजी मात्र दररोज तिचा चष्मा कुठं आहे हे साफ विसरून जायची मग शोधत बसायची. मला चष्म्याशिवाय सगळं धुरकट दिसतं, म्हातारी झाले न मी..म्हणायची असा काहीतरी यंत्र पाहिजे ज्याला काहीही विचारलं तर ते सांगेल.. मी अलेक्सा हे प्रॉडक्ट प्रथम पाहिलं तेव्हा मला आजी आठवली,आता असती तर म्हणली असती 'अग ह्या अलेक्साला विचारलं की माझा चष्मा कुठाय तर ती सांगेल?' कदाचित अलेक्सा च्या मेमरी बँकेत नसणारं गाणं आजी ने तिला शिकवलं असतं!