Life of Stories

# 1720: "जिवंत वाळवणे". लेखक : सई लळीत. कथन : ( मृदुला जोशी )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

कोकणातील अंगणं मे महीन्यात नटलेली दिसतात. आंबे भरपूर असले की गोड आंबट मिरमि-या डिकाळया तिखटा बिटक्या काळया, शेंदरी, उग्रट सगळया प्रकारच्या आंब्यांचा रस काढतात. स्टिलच्या ताटाला तुपाचा हात लावून हा रस ताटात ओततात. एकदम जाड थर देत नाहीत. मध्यम देतात. रस चांगला वाळायला हवा. मग दुस-या दिवशी परत दुसरा थर देतात. असे पाच सहा थर देतात. रोज नवे आंबे नवा रस. त्यांचा रंग रोज बदलतो. पिवळा ते भगवा यातल्या अनेक छटा तिथे अवतरतात. याला साठं म्हणतात.