Life of Stories

# 1740: शत्रुध्न ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

एके रात्री, माता कौशल्या जी झोपेत असताना त्यांच्या राजवाड्याच्या गच्चीवर कोणीतरी चालत असल्याचा आवाज ऐकू आला.

त्या उठल्या आणि त्यांनी विचारले, "कोण आहे तिकडे?"
त्यांना कळले की ती शत्रुघ्नजींची पत्नी श्रुतकीर्ती आहे.

माता कौशल्येनी तिला खाली बोलावून घेतलं.

श्रुतकीर्तीजी आल्या, त्यांच्या पायाशी नतमस्तक झाल्या आणि तिथे उभ्या राहिल्या.

माता कौशल्याजींनी विचारले: "श्रुती! मुली, तू इतक्या रात्री गच्चीत एकटी काय करतेय? तुला झोप येत नाही का? आणि शत्रुघ्न कुठे आहे?"
श्रुतकीर्तीचे डोळे अश्रूंनी भरले,
ती तिच्या सासू-आईला बिलगली,
तिला मिठी मारत म्हणाली:
"आई, मी त्यांना पाहून तेरा वर्षे झाली आहेत".
हे ऐकून कौसल्येच्या उरात धस्स झालं..!