Life of Stories

# 1741: सायकल आणि चौदा देश. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

स्पेनमधून जाताना ती उशिरापर्यंत सायकल चालवत होती. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. इतक्यात दोन तरुण समोरून बाईकवर आले. वेदांगील पाहून ते थांबले आणि अचानक चाकू काढून तिच्यावर रोखला. त्यांना पैसे हवे होते. म्हणून त्यांनी झटापट केली. वेदांगीला थोडी दुखापतही झाली. ती घाबरली. तोवर पैसे घेऊन ते तरुण पळून गेले होते. खरी अडचण त्यापुढे होती. वेदांगीला स्थानिक भाषा येत नव्हती. स्थानिक लोकांना इंग्लिश येत नव्हते. मुश्किलीने इतरांची मदत घेतली आणि डॉक्टरांकडे गेली. तिला लुटणारे होते, तसेच मदत करणारेही होते. त्यामुळे वेदांगी खऱ्या अर्थाने जग पाहत होती. उपचार करून ती पुढे निघाली, पण असा प्रसंग पुन्हा केव्हाही येऊ शकणार होता.