
Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Life of Stories
# 1773: "एक शून्य मी" लेखक पु. ल. देशपांडे. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
दुकानदार डोळ्यांत तेल घालून थेंबाथेंबाचा तेलाचा दाम दसपटीने वसूल करत होता. एका फाटक्या परकर पोलक्यांतल्या पोरीने दुकानदाराकडे मातीची पणती ठेवली.
ती म्हणाली, "येवढं पणतीभर द्या."
"अग, दिवाळीला अवकाश आहे ! पणत्या कसल्या लावतेस?" पोरगी गांगरली. पण दारिद्रय धिटाई शिकवते.
"दिवाळी कसली? खायला त्याल द्या..."
"ह्या पणतीत?" दुकानदार म्हणाला.
मुलीने हातातले दहा पैशाचे नाणे टेबलावर ठेवले. "यवड्या पैशात किती बसतं ते द्या"
"पण आमच्याकडे धाच पैशेच हाइत."
'खायाचे तेल' परवडत नाही. आता पणतीचे आणि माझे नाते दिवाळीच्या रोषणाईशी होते ते तुटून गेले आहे.