Life of Stories

# 1773: "एक शून्य मी" लेखक पु. ल. देशपांडे. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

दुकानदार डोळ्यांत तेल घालून थेंबाथेंबाचा तेलाचा दाम दसपटीने वसूल करत होता. एका फाटक्या परकर पोलक्यांतल्या पोरीने  दुकानदाराकडे मातीची पणती ठेवली.

ती म्हणाली, "येवढं पणतीभर द्या."

"अग, दिवाळीला अवकाश आहे ! पणत्या कसल्या लावतेस?" पोरगी गांगरली. पण दारिद्रय धिटाई शिकवते.

"दिवाळी कसली? खायला त्याल द्या..."

"ह्या पणतीत?" दुकानदार म्हणाला.

मुलीने हातातले दहा पैशाचे नाणे टेबलावर ठेवले. "यवड्या पैशात किती बसतं ते द्या"

"पण आमच्याकडे धाच पैशेच  हाइत."

'खायाचे तेल' परवडत नाही. आता पणतीचे आणि माझे नाते दिवाळीच्या रोषणाईशी होते ते तुटून गेले आहे.