Life of Stories

# 1774: यकृतायन ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

शरीराची अनेक खाती स्वतःकडे असणारा आणि त्यांचा कारभार समर्थपणे सांभाळणारा अवयव म्हणजे यकृत! कारभार मोठा त्यामुळे आकारही मोठा आणि वजनदार आसामी, दीड किलो वजन असलेला ऐवज! कारभार तर एवढा मोठा की जवळ जवळ पाचशे वेगवेगळ्या प्रकारची कामे यकृत कोणताही गाजावाजा न करता शांतपणे हाताळत असते. जणू काही कर्मयोगीच! अशा कर्मयोग्याला (अप्रत्यक्षपणे) दारू पाजून आपण त्याच्या कामात अडथळा आणतो, त्याला त्रास देतो, त्याच्यावर जुलूम करतो. आपण करतो पण निस्तरावं लागतं यकृताला!