Life of Stories

# 1782: खरी कृतज्ञता. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

शाळेत असताना सुंदर अतिशय शांत मुलगा होता. तो कधीही आक्रमक नव्हता. पण अतिशय चौकस होता. त्याचे शिक्षक म्हणत,
"सुंदर ची स्मरणशक्ती आरशासारखी आहे. एकदा डायल केलेला नंबर अथवा लिहिलेला कोड त्याचा तोंड पाठ होत असे."
कधी कधी त्याचे शाळेतले मित्र त्याच्या जुन्या बुटांवरून आणि घरून आणलेल्या डब्यावरून त्याची टर उडवत असत. पण त्याने कधीही कोणालाही प्रतिउत्तर केले नाही. तो केवळ स्मित हास्य करत असे आणि तेथून काढता पाय घेत असे.