Life of Stories

# 1784: डिग्निटी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

एकदा आमच्या सातव्या फ्लोअरवरच्या रेफ्युजी एरियात, आम्हा मुलांची पार्टी चालू होती रात्रीची. आम्ही जवळ जवळ विसेक मुलं - मुली होतो... आणि होते अर्थातच एकमेवं, चितळे काका. पिझ्झा, पावभाजीचा बेत होता... सॅाफ्ट ड्रिंक्स होती... मजा, मस्ती चाललेली. किशोर कुमारची दोनेक गाणी ऐकवून... वाहवा मिळवून... खुर्चीत बसले होते काका, पावभाजीची प्लेट हातात घेऊन. आणि... आणि अचानक कोसळले ते खाली. छातीला हात लावत कळवळू लागले ते. आम्हा मुलांचं तर अक्षरशः धाबं दणाणलं. कोणीतरी जाऊन चितळे काकूंना कळवलं. दोन्ही खांद्याभोवती पदर गुंडाळलेल्या काकू, गडबडीतच वर आल्या. एव्हाना चितळे काकांची हालचाल, पुर्ण बंद झाली होती. आणि पुढे जे काही आम्ही मुलांनी पाहिलं, ते निव्वळ अविश्वसनीय होतं...