Life of Stories

# 1785: "वय असतं का पावसाला?" प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

"आईच्या खांद्यावरून तिच्या मऊ पदराखालून बघताना पाऊस एक वर्षाचा असतो.

शाळेतून येताना छत्री मुद्दाम वाऱ्याच्या दिशेने धरून उलटी करन चिंब भिजताना पाऊस

 दहा वर्षांचा असतो!

भिजायला नको वाटायला लागलं आणि आडोसा आवडायला लागला की पन्नाशी येते पावसाची..

गुडघे दुखू लागले आणि डोक्यावर केस जाऊन चंद्रोदय झाला की साठीशांती होते पावसाची..

..........असतं नं वय पावसाला ?"