Life of Stories

# 1793: हेच खरं आयुष्याचं गणित. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

आई-बापानं ४०० रुपये हातावर ठेवले.
"हे घे. पण बघ, चांगले हापूसच घ्यायचे. आणि तुझे-तुझे पैसै वाचवून घ्यायचे. व्यवहार शिक. भाव करायला शीक." असं म्हणून पाठवलं.
पोरगं धडपडलं.
कधी एका गाड्यावर, कधी दुसऱ्या दुकानात. पण कोणीच ४०० च्या खाली एक डझन आंबे द्यायला तयार नव्हतं. कोणी म्हणे ५००, कोणी ४८०.
डोळ्यात थोडं नाराजीनं पाणी आलं.
पण मागे फिरणार नव्हता.
आईचं बोलणं आठवत होतं, "हुशारी म्हणजे फक्त पुस्तकात नाही, व्यवहारात पण शहाणपण लागतं."