Life of Stories

# 1802: चिमुरडी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

ते रोजच्या प्रमाणे किराणा  दुकान बंद करून गल्लीमध्ये थोडं पाय मोकळे करायला निघाले होते. इतक्यात एक गोड, कोवळी हाक आली —
"काका… काका…"
ते वळाले.
७-८ वर्षांची एक चिमुरडी, धापा टाकत त्यांच्याकडे धावत येत होती.
"काय झालं गं... एवढी धावत आलीस?"
काकांनी थोड्या थकलेल्या पण प्रेमळ स्वरात विचारलं.
"काका... पंधरा रुपयांचे तांदूळ आणि दहा रुपयांची डाळ घ्यायची होती..."
मुलीच्या डोळ्यांत निरागसता आणि गरज दोन्ही स्पष्ट दिसत होती.
काकांनी मागे वळून आपल्या दुकानाकडे पाहिलं.
"आता दुकान बंद केलं गं... सकाळी ये, मिळेल."