Life of Stories

# 1870: आपण चॅाकलेट का खातो? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

लाडू, जिलबी, गुलाबजाम हेदेखील गोडच पदार्थ! हे पदार्थ भरमसाट खाल्ले जातात ते फक्त लग्नाच्या पंगतीत पैज जिंकण्यासाठीच! एरवी नाही. मग चॉकलेट खायचा सपाटा का लागतो? शिवाय चॉकलेट गोड असतं ते आता! पण सुमारे पंचवीसशे वर्षांपूर्वी, अमेरिकेतल्या माया संस्कृतीतले लोक कडू कोकोबिया, तिखट मिरच्या आणि बेचव मक्याचं पीठ पाण्यात मिसळून, उकळून, घुसळून फेसाळ पेय बनवत. त्याचं नाव होतं, ‘xocolatl’ (झॉकलेटल)  म्हणजे ‘कडू पाणी’! मायन लोक ते रसायन त्यांच्या समारंभांत देवाचं पेय म्हणून चाखतमाखत चवीचवीने पीत. नंतरच्या ऍझटेक संस्कृतीनेही मायन लोकांकडून ते कडू देवपेय हट्टाने घेतलं. स्पॅनिशांनी ते युरोपात नेलं.