Life of Stories

# 1890: Ten days in a mad-house. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

‘पिट्सबर्ग डिसपॅच’ या स्थानिक वृत्तपत्रात‘मुली कसल्या कामाच्या?’ अशा आशयाचा एक लेख छापून आला. अपत्यप्राप्ती करून देणे आणि घर राखणे, मुली एवढ्याच कामाच्या असे त्या लेखक महाशयांचे म्हणणे. वयाच्या जेमतेम विशीत पाऊल ठेवलेल्या एलिझाबेथने त्यावर एक खरमरीत प्रतिक्रिया लिहून पाठवून दिली. ती संपादकांना आवडली. त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रात तिला एक छोटा स्तंभलिहिण्याची संधी दिली. त्याकाळी स्त्रिया सहसा टोपणनावाने लेखन करीत. वृत्तपत्राच्या संपादकाने 'नेल्ली ब्लाय' हेच नाव टोपणनाव म्हणून दिले.