Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Life of Stories
# 1894: "सुनिता बाई आणि पु.ल." लेखक सुभाष अवचट. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
सुनीताबाईंनी त्या संध्याकाळी बोरकरांच्या कविता एकामागून एक, जादू उलगडत जावी तशा ऊलगडल्या.
ते अनपेक्षित लाघव मला पेलवेना. मी खुर्चीत थिजून गेलो.
त्या संध्याकाळी अख्खं बालगंधर्व, बोरकर नावाच्या लाटेवर उसळून ओसंडून जात राहिलं..
"आहे मनोहर तरी" या सुनीताबाईंच्या आत्मचरित्राबद्दल लेखक त्यांना म्हणतात ...
"पुलंचं अख्खं आयुष्य ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक श्रीमंतीची एवढी प्रदीर्घ कहाणी आहे, ती तुमच्यादेखत घडली.
तुमच्या काळातली आकाशाएवढय़ा उंचीची अनेक माणसं
तुमच्या आयुष्यात, घरात राहून, वावरून गेली.
अनेक प्रसंगांना, गप्पांना, महत्त्वाच्या वादविवादांना तुम्ही साक्षी होतात.
हे सगळं नोंदवणारी, टिपू शकणारी, त्याचं महत्त्व माहिती असणारी प्रखर बुद्धिमत्ता तुमच्यापाशी होती; तर तुम्ही त्यातलं काहीही न लिहिता, पुलंनी कपाटात ठेवलेल्या शर्टाच्या घडय़ा मोडून
त्यांची इस्त्री कशी विस्कटली, हे इतकं सामान्य काहीतरी कसं काय लिहिता तुमच्या पुस्तकात?
याला काही अर्थ तरी आहे का?’’