Life of Stories

# 1901: आईच्या चप्पलांची किंमत. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

गोविंद म्हणाला, " मला माझ्या आईसाठी चप्पल हवी आहे. ती नेहमी अनवाणीच असते, त्यामुळे तिच्या चपलेचं माप नाहीये माझ्याकडे. हो, पण माझ्याकडे माझ्या आईच्या पायाचे माप नसलं तरी तिच्या पायाची आकृती आहे, त्यावरून चप्पल देऊ शकाल का?"
दुकानदाराला हे अजबच वाटलं. तो म्हणाला, "याआधी अशी आकृती पाहून चप्पल आम्ही कधीच दिली नाही, त्यापेक्षा तुम्ही तुमच्या आईलाच का घेऊन येत नाही?" तेव्हा गोविंद म्हणाला, "माझी आई गावाला राहते. शिवाय आजवर तिने कधीच चप्पल घातली नाही. माझ्यासाठी मात्र खूप कष्ट घेऊन तिने माझे शिक्षण पूर्ण करून दिले. आज मला माझ्या नोकरीचा पहिला पगार मिळाला आहे, त्यातून आईसाठी भेट म्हणून मी चप्पल घेणार आहे. हे ठरवूनच मी घरून निघताना आईच्या पायांची आकृती घेतली होती." असे म्हणत त्यानं आईच्या पावलांच्या आकृतीचा कागद दुकानदाराला दिला. दुकानदाराचे डोळे पाणावले.