Life of Stories

# 1903: प्रार्थना. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

डॅा. सौ. आरती जुवेकर.

Send us a text

बालपणापासून आपल्याला ‘जीवनातील प्रार्थनेचं महत्व‘ सांगितले जाते. जेव्हा काही समजतही नव्हते, तेव्हासुद्धा देवासमोर उभं करून हात जोडायला शिकवले जायचे. थोडे समजायला लागल्यावर “बाप्पाला सांग मला चांगली बुद्धी दे”, असं बोलायला शिकवले. आणखी थोडे समजदार झाले तेव्हा स्वतःला जमेल, पटेल तशी प्रार्थना करायला लागलो. या प्रार्थनेमध्ये मनाला शांत करण्याची अमाप शक्ति आहे. म्हणून आयुष्यात कोणतेही संकट आले की मनुष्य ईश्वराच्या दारी धाव घेतो.