Life of Stories

# 1904: वंदेमातरम् ची १५० वर्षे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

डॅा. सौ. आरती जुवेकर.

Send us a text

या वर्षी आपण वंदेमातरम या गीताची १५०वर्ष पूर्ती साजरी करत आहोत. सात नोव्हेंबर या दिवशी १८७५ साली बँकिंचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम ही सहा दिव्य श्लोक किंवा कडवी असलेली स्वर्गीय रचना केली. जगाच्या पाठीवर एव्हढी उदात्त रचना झाली नाहीये आणि होणार ही नाही.... कारण मातृभूमी बद्दल एव्हढी उदात्त संकल्पना ही याच भूमीचं, याच संस्कृतीचं देणं आहे.... या भूमीला केवळ माताच नव्हे तर देवीचे स्थान देणारी आपली संस्कृती.... आणि पारतंत्र्याच्या काळात सर्व समाजाला जागृत करणारं हे महाकाव्य याच उदात्ततेचे अधिष्ठान....