Life of Stories

# 1927: "The little Match girl" Hans Christian Anderson. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.

Send us a text

ख्रिसमसच्या रात्री रस्त्यावर एक लहान मुलगी थंडीने कुडकुडत कडेपेट्या विकते आहे. पण कोणालचा त्या खरेदी  करायच्या नाहीत. कारण  ते सर्व घाईत निघाले आहेत उबदार घरांकडे, सुरक्षिततेकडे, आनंदाकडे.

तिच्या आजूबाजूला बर्फ आहे, पोटात भूक आहे आणि मनात असुरक्षितता  आहे. 

त्या अंधारात तिला आधार मिळतो तो वास्तवाकडून नाही, तर तिच्या कल्पनाशक्तीकडून  शेगडी, अन्न, ख्रिसमस ट्री आणि आजीच्या रूपाने. 

त्या रात्री ती मुलगी थंडीने मरते, पण समाजही  मरतो हळूहळू माणुसकी गमावून.....!